‘व्हॅस्कॉन’ने जपलं, पॅशन इंजिनिअरिंगचं

इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी भयंकर अवघड, किचकट अशी सर्वांचीच धारणा असते. पण, हेच किचकट काम आवडणाऱ्या आणि ते काम समजून घेऊन त्यातून खरंच काहीतरी नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या लोकांची टीम म्हणजे ‘व्हॅस्कॉन’.

प्रत्यक्ष इमारत बांधण्याची सुरुवात होण्याच्या कितीतरी आधीपासूनच व्हॅस्कॉन टीमचं काम सुरू झालेलं असतं. घर बांधण्याची गणितं, डिझाईनिंग, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर भरपूर काम झाल्याशिवाय, व्हॅस्कॉनचा कोणताही गृहप्रकल्प बांधायला घेतला जात नाही.

गेल्या ३० वर्षांपासून व्हॅस्कॉनची टीम, आधुनिक आणि लोकांना कम्फर्ट देतील, अशा वास्तू बनवत आहे. आपल्या ग्राहकांना नव्या सुविधांचा फायदा कसा देता येईल, या विचारातूनच व्हॅस्कॉनच्या इमारतींची आखणी आणि बांधणी केली जाते. कोणतंही बांधकाम असलं, तरी त्यासाठी उच्च प्रतीच्या साहित्याचाच वापर करून बांधकाम करण्यात येते. बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वात सुरक्षित आणि भक्कम घरंच ग्राहकांना दिली जातात, याचा संपूर्ण व्हॅस्कॉन टीमला अभिमान आहे.

Vascon GoodLife

आपण सर्वसामान्य लोकं घर घेताना, भिंतीला रंग कोणता द्यायचा, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या हा विचार करतो, पण त्या भिंतींसाठी कोणतं मटेरियल वापरायचं, प्रत्येक मजल्यावर नक्की कुठे आणि कशा भिंती बांधण्याने लोकांना वापरायला जास्त जागा मिळेल, अशा असंख्य लहान मोठ्या गोष्टींचा विचार करूनच व्हॅस्कॉनच्या प्रत्येक बांधकामाला सुरुवात केली जाते.

गृहप्रकल्प बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील, कॉंक्रिटचा दर्जा, बांधकाम पद्धती आणि क्युरिंग प्रोसेस यावर कोणत्याही प्रकल्पाचं आयुष्य ठरत असतं. कॉंक्रिट मिक्श्चर आणि बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, योग्य प्रमाणात वापरून दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता, घरं बांधण्याचं कौशल्य व्हॅस्कॉनने अवगत केलं आहे. म्हणूनच दर्जेदार वस्तू आणि योग्य पद्धती वापरून बनवलेले व्हॅस्कॉनचे गृहप्रकल्प ठरतात पिढ्यानु पिढ्यांच्या सुखांचे साक्षीदार.

व्हॅस्कॉनची पॅशन असलेलं इंजिनिअरिंग इथल्या संपूर्ण स्टाफच्याही नसानसातून वाहतं, असं म्हणलं, तरी वावगं ठरणार नाही. बांधकामाचं काम प्रत्यक्ष साईटवर होत असलं, तरी ते काम चोख व्हावं, यासाठी झटणारी एक मोठी टीम बॅक ऑफिसला कार्यरत असते. स्टाफने बांधकामापूर्वी केलेल्या अभ्यासातून, प्रत्येक इमारतरूपी आविष्कार घडत असतो. आधीच्या इमारतींपेक्षा नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न व्हॅस्कॉनच्या टीमकडून सतत केला जातो. त्यामुळे व्हॅस्कॉनची कोणतीच इमारत ही दुसऱ्या इमारतीसारखी नसते. व्हॅस्कॉन टीम आपल्या प्रत्येक इमारतीच्या इंजिनिअरिंगची जबाबदारी घेते आणि आपल्या सर्व कामांचा अभिमानही बाळगते. 

व्हॅस्कॉनचा कातवी इथे तयार होत असलेला नवा आविष्कार म्हणजे ‘गुडलाईफ’. वेगवेगळ्या वयोगटांचा, राहायला येणाऱ्या लोकांचा अभ्यास करून हा गृहप्रकल्प तयार केला जात आहे. इथे असंख्य सुखसुविधा, सुंदर आणि सोयीस्कर लोकेशन यांचा मिलाफ करण्यात आला आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या ३०+ वर्षांच्या अनुभवाची झलक दाखवणारा प्रकल्प म्हणजे ‘गुडलाईफ’. अशा सर्वार्थानं आनंदी राहणीमान देणाऱ्या ‘गुडलाईफ’मधली घरं सुरू होतात अवघ्या १३.९८ लाखांपासून. स्टुडिओ, १, २ बीएचके घरांसाठी आजच व्हॅस्कॉनच्या ‘गुडलाईफ’ला भेट द्या आणि आपलं लाईफ ‘गुडलाईफ’ करा.

Vascon GoodLife Katvi Takegaon

 

1, पुणे येथे                                                                                                                  व्हॅस्कॉन, गुडलाईफ

१३.९८ लाखांपासून पुढे                                                                                               संपर्क: +९१८८७९०६६०१६

स्टुडिओ होम्स, १ आणि २ बीएचके  

   

महारेरा क्र.: फेज ए: P५२१०००१६२४२· फेज बी: P५२१०००१६२३७· फेज सी: P५२१०००१६२९३ www.maharera.mahaonline.gov.in

Prev
Next
0/5 (0 Reviews)