‘व्हॅस्कॉन’ने जपलं, पॅशन इंजिनिअरिंगचं
इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी भयंकर अवघड, किचकट अशी सर्वांचीच धारणा असते. पण, हेच किचकट काम आवडणाऱ्या आणि ते काम समजून घेऊन त्यातून खरंच काहीतरी नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या लोकांची टीम म्हणजे ‘व्हॅस्कॉन’.
प्रत्यक्ष इमारत बांधण्याची सुरुवात होण्याच्या कितीतरी आधीपासूनच व्हॅस्कॉन टीमचं काम सुरू झालेलं असतं. घर बांधण्याची गणितं, डिझाईनिंग, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर भरपूर काम झाल्याशिवाय, व्हॅस्कॉनचा कोणताही गृहप्रकल्प बांधायला घेतला जात नाही.
गेल्या 30+ वर्षांपासून व्हॅस्कॉनची टीम, आधुनिक आणि लोकांना कम्फर्ट देतील, अशा वास्तू बनवत आहे. आपल्या ग्राहकांना नव्या सुविधांचा फायदा कसा देता येईल, या विचारातूनच व्हॅस्कॉनच्या इमारतींची आखणी आणि बांधणी केली जाते. कोणतंही बांधकाम असलं, तरी त्यासाठी उच्च प्रतीच्या साहित्याचाच वापर करून बांधकाम करण्यात येते. बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वात सुरक्षित आणि भक्कम घरंच ग्राहकांना दिली जातात, याचा संपूर्ण व्हॅस्कॉन टीमला अभिमान आहे.
आपण सर्वसामान्य लोकं घर घेताना, भिंतीला रंग कोणता द्यायचा, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या हा विचार करतो, पण त्या भिंतींसाठी कोणतं मटेरियल वापरायचं, प्रत्येक मजल्यावर नक्की कुठे आणि कशा भिंती बांधण्याने लोकांना वापरायला जास्त जागा मिळेल, अशा असंख्य लहान मोठ्या गोष्टींचा विचार करूनच व्हॅस्कॉनच्या प्रत्येक बांधकामाला सुरुवात केली जाते.
गृहप्रकल्प बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टील, कॉंक्रिटचा दर्जा, बांधकाम पद्धती आणि क्युरिंग प्रोसेस यावर कोणत्याही प्रकल्पाचं आयुष्य ठरत असतं. कॉंक्रिट मिक्श्चर आणि बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, योग्य प्रमाणात वापरून दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता, घरं बांधण्याचं कौशल्य व्हॅस्कॉनने अवगत केलं आहे. म्हणूनच दर्जेदार वस्तू आणि योग्य पद्धती वापरून बनवलेले व्हॅस्कॉनचे गृहप्रकल्प ठरतात पिढ्यानु पिढ्यांच्या सुखांचे साक्षीदार.
व्हॅस्कॉनची पॅशन असलेलं इंजिनिअरिंग इथल्या संपूर्ण स्टाफच्याही नसानसातून वाहतं, असं म्हणलं, तरी वावगं ठरणार नाही. बांधकामाचं काम प्रत्यक्ष साईटवर होत असलं, तरी ते काम चोख व्हावं, यासाठी झटणारी एक मोठी टीम बॅक ऑफिसला कार्यरत असते. स्टाफने बांधकामापूर्वी केलेल्या अभ्यासातून, प्रत्येक इमारतरूपी आविष्कार घडत असतो. आधीच्या इमारतींपेक्षा नवं काहीतरी देण्याचा प्रयत्न व्हॅस्कॉनच्या टीमकडून सतत केला जातो. त्यामुळे व्हॅस्कॉनची कोणतीच इमारत ही दुसऱ्या इमारतीसारखी नसते. व्हॅस्कॉन टीम आपल्या प्रत्येक इमारतीच्या इंजिनिअरिंगची जबाबदारी घेते आणि आपल्या सर्व कामांचा अभिमानही बाळगते.
व्हॅस्कॉनने आपल्या तीन दशकांच्या बांधकाम क्षेत्रातील कारकीर्दीमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या प्रीमियम वास्तू बांधल्या, तसंच त्यांनी कोणत्याही तडजोडीशिवाय व्हॅल्यू होम्सचीही बांधणी केली. आपल्या इमारतीत राहायला येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही, याची काळजी व्हॅस्कॉनने कायमच घेतली.
व्हॅस्कॉनचा तळेगावजवळ कातवी इथे तयार होत असलेला नवा आविष्कार म्हणजे ‘गुडलाईफ’. इथे राहायला येणाऱ्या लोकांना सर्वार्थानं ‘गुड लाईफ’ म्हणजे ‘चांगलं(च) आयुष्य’ मिळावं, यासाठी व्हॅस्कॉनची संपूर्ण टीम अहोरात्र झटत आहे.
‘गुडलाईफ’मध्ये राहायला येणाऱ्या वेगवेगळ्या वयोगटांच्या लोकांचा, त्यांच्या गरजांचा अभ्यास करून हा गृहप्रकल्प तयार केला जात आहे. इथे येणाऱ्या लोकांना असंख्य सुखसुविधा, सुंदर आणि सोयीस्कर लोकेशन यांचा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.
लहान मुलांना खेळण्यासाठी, अभ्यासासाठी काहीही कमी पडू नये, या विचारातून चिल्ड्रेन्स प्ले एरिया, स्केटिंग ग्राउंड, नामांकित अकादमीकडून स्पोर्ट्स कोचिंग, ऑनलाईन एज्युकेशन रूम्स, लायब्ररी, सुसज्ज स्टडी रूम्स अशा सुविधा पुरवण्यात येत आहेत. मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं या दृष्टीने हा प्रकल्प बांधण्यात येत आहे.
फ्लॅटसंस्कृतीमुळे माणसं एकमेकांपासून तुटतात, असं सतत घरातील वयस्कर लोकांना वाटत असतं, पण ‘गुडलाईफ’ मध्ये तसं होणार नाही, कारण इथल्या कम्युनिटी लाईफचा विचार करूनच इथल्या अनेक अॅमेनिटीज डिझाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘गुडलाईफ’मध्ये राहणारी लोकं कायमच एकमेकांशी घट्ट बांधलेली असतील.
भविष्याचा विचार करून वापरलेलं आधुनिक तंत्रज्ञान, ही तर ‘गुडलाईफ’ची खासियत आहे. अनेकदा सुंदर सुंदर रचनांची घरं बनवली तर जातात, पण भविष्याच्या आणि मेंटेनन्सच्या दृष्टीने ती घरं त्रासदायक ठरतात. असं ‘गुडलाईफ’मध्ये होऊ नये, या विचारातूनच घरांची बांधणी करण्यात आली आहे. मेंटेनन्ससाठी सोप्या जातील अशाच पद्धतीने इथले बांधकाम करण्यात येत आहे.
व्हॅस्कॉनच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या 30+ वर्षांच्या अनुभवाची, पॅशनची झलक दाखवणारा प्रकल्प म्हणजे ‘गुडलाईफ’. सर्वार्थानं आनंदी राहणीमान देणाऱ्या ‘गुडलाईफ’मधली घरं सुरू होतात अवघ्या 13.98 लाखांपासून. स्टुडिओ, 1 आणि 2 बीएचके घरांसाठी आजच व्हॅस्कॉनच्या ‘गुडलाईफ’ला भेट द्या आणि आपलं लाईफ ‘गुडलाईफ’ करा.
संपर्क: +९१८८७९०६६०१६
महारेरा क्र.: फेज ए: P५२१०००१६२४२· फेज बी: P५२१०००१६२३७· फेज सी: P५२१०००१६२९३ www.maharera.mahaonline.gov.in